
सचिव पदी निवड झाल्याबद्दल भिवडी ग्रामस्थांकडून नागरी सत्कार
मना न्यूज नेटवर्क
कोरेगांव,
संतोष शेलार यांची सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग सचिव पदी निवड झाल्याबद्दल भिवडी ग्रामस्थांकडून त्यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. वैधानिक विकास महामंडळाचे उल्हास पवार यांचे हस्ते सपत्नीक मानपत्र संतोष शेलार व मृणाल शेलार यांनी स्वीकारले . या प्रसंगी माजी खासदार राज्यपाल श्रीनिवास पाटील, शंकर शेलार, मधुसूदन मुळे, ह भ प प्रमोद महाराज जगताप, गजानन शेलार, द्रौपदा शेलार, राजेंद्र शेलार, अमित शेलार आदि उपस्थित होते.
कोरेगाव तालुक्यातील धरणग्रस्त भिवडी गाव येथील वारकरी गजानन शेलार यांचे चिरंजीव संतोष गजानन शेलार यांची महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभाग सचिव पदी निवड झाल्याबद्दल भिवडी या त्यांच्या जन्म गावी ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.
सचिव झाले बद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वैधानिक विकास महामंडळाचे उल्हासपवार, माजी खासदार राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र शेलार, भाजपा मुंबई अमित शेलार, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, . ह भ प भागवताचार्य अनंतशास्त्री, जिल्हा परिषद सदस्य हणमंत जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, पंचायत समिती सभापती रूपाली गुरव, उद्योजक ज्ञानदेव शेठ सणस, सातारा जिल्हा बँकेची माजी संचालक सुनील माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी क्षीरसागर, भोसले,रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदय उंडाळकर, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक बाबासाहेब कदम, संचालक संदीप चव्हाण, सातारा जिल्हा वारकरी संघटनेचे अध्यक्ष बबनराव सापते यांनी विशेष शुभेच्छा दिल्या
जावली सहकारी बँकेचे संचालक संतोष कळंबे, निवृत्त अधीक्षक अभियंता महावितरण अरुणराव शिंदे, माजी सभापती चंद्रकांत शेलार, प्रा.श्रीधर साळुंखे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय नवघणे (मुंबई), कृष्णा प्रकल्पग्रस्त विकास ज्ञान प्रबोधन संस्था सातारा ( प्रकल्पग्रस्त आजी- माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य , धरणग्रस्त तमाम संघटना) सर्व पदाधिकारी, ह भ प विजय लेवे, हभप उत्तम शेलार, शांत मारुती वैष्णव दिंडीचे सर्व वारकरी, भिवडी गावचे सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळ भिवडी, नेहरू युवा मंडळ, ग्राम विकास मंडळ मुंबई, भिवडी ग्रामस्थ, सर्व ग्रामस्थ क्षेत्र ल्हसूर्णे, मुगाव, जरेवाडी, तांदुळवाडी, त्रिपुटी, जांब, संतोष बापू शेलार नागरी सत्कार संयोजन समिती यांनी शुभेच्छा देण्यात आल्या .


