साताऱ्याच्या दहा रणरागिणींनी सर केली सांदन व्हॅली!

साताऱ्याच्या दहा रणरागिणींनी सर केली सांदन व्हॅली!

साताऱ्याच्या दहा रणरागिणींनी सर केली सांदन व्हॅली!

सातारा: अंगावर काटा आणणाऱ्या निसरड्या वाटा, खोल दऱ्या, प्रचंड दगड धोंडे आणि सूर्यकिरणेही पोहोचू शकणार नाहीत असा गडद अंधार या सर्व आव्हानांवर मात करीत सातारच्या दहा रणरागिणींनी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची अत्यंत खडतर मानली जाणारी सांदन व्हॅली यशस्वीरीत्या सर केली आहे. सलग १२ तास निसर्गाच्या रौद्ररूपाशी थेट मुकाबला करीत या नारीशक्तीने हे सलग १२ तास निसर्गाच्या रौद्ररूपाशी बेट मुकाबला करीत या नारीशक्तीने हे खडतर आव्हान पूर्ण केले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील साम्रद गावातून गुरुवारी सकाळी सात वाजता या थरारक मोहिमेला सुरुवात झाली. तब्बल चार किलोमीटर लांबीच्या या अत्यंत अरुंद आणि खोल दरीत उतरताना महिलांच्या धैर्याची खरी परीक्षा होती. केवळ उंचावरून खाली उतरणे एवढेच हे आव्हान नव्हते, तर दरीच्या तळाशी असणाऱ्या प्रचंड मोठ्या दगड-धोंड्यांमधून स्वताचा मार्ग शोधणे तितकेच कठीण होते. सुमारे १२ किलोमीटरचा खडतर पायी प्रवास पूर्ण करीत या महिलांनी ठाणे जिल्ह्यातील डेहणे गाव गाठले आणि मोहिमेच्या यशाचा एकच जल्लोष केला.

या मोहिमेत सोनाली खैरमोडे, नेहा गायकवाड, विजया कदम, शशी घोरपडे, भाग्यश्री गायकवाड, सविता गायकवाड, उषा जगदाळे, आशा माने, मनीषा जाधव आणि सुप्रिया मोरे या महिलांचा समावेश होता. या सर्व महिलांना हा कठीण ट्रेक पूर्ण करण्यासाठी प्रशांत खैरमोडे आणि संजय गायकवाड यांच्यासह इतर सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या संपूर्ण ट्रेकमधील सर्वात अंगावर शहारे आणणारा भाग होता रॅपलिंग, अनेक ठिकाणी अतिशय धोकादायक आणि सरळ रेषेतील उतारावरून केवळ एका दौराच्या साहाय्याने या महिलांनी स्वताला खोल दरीत झोकून दिले. यात आणखी भर पडल्ली ती दरीतील प्रतिकूल वातावरणाची ज्या ठिकाणी सूर्याचा प्रकाशही पोहोचत नाही, अशा काळोख्या दरीमध्ये छातीभर असलेल्या अत्यंत थंडगार पाण्यातून दोर पकडून पुढे जावे लागत होते. निसर्गाचे हे रूप अवाक करणारे होते, मात्र सातारच्या या लेडीच्या आत्मविश्वासापुढे निसर्गाचे हे आव्हानही फिके पहले

1044 x 558 217.3KB

Hello Satara

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!