महाबळेश्वरमध्ये दमदार पावसाची हजेरी; नागरिकांना दिलासा

महाबळेश्वरमध्ये दमदार पावसाची हजेरी; नागरिकांना दिलासा

महाबळेश्वर : शहरासह परिसरात बुधवारी दिवसभर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवार सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० या २४ तासांत १५७.२ मिमी (६.१८ इंच) पावसाची नोंद झाली. जून महिन्याच्या सुरुवातीपासून २४ जूनपर्यंत एकूण ७.९३ इंच पाऊस झाला आहे.

जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटल्यानंतरही पावसाने दडी मारल्याने महाबळेश्वरकर चिंतेत होते. मात्र, गेल्या दोन दिवसांतील दमदार पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळी पर्यटन हंगाम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता पावसाळ्याच्या तयारीला वेग आला आहे.

घरांमध्ये किराणा साठवणे, इमारतींवर प्लास्टिक आच्छादन करणे, तसेच थंडीपासून बचावासाठी शेगडीच्या कोळशाची खरेदी वाढली आहे. बाजारपेठेत रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट, पावसाळी चप्पल, बूट आणि क्रॉक्स खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.

दरम्यान, पावसामुळे शेतीच्या कामांनाही गती मिळाली असून परिसरात भातलावणीची लगबग सुरू झाली आहे. आगामी काही दिवसांतही असाच मुसळधार पाऊस सुरू राहावा आणि वेण्णा तलाव भरून वाहावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!