नवऱ्याला फोन-मेसेज केल्याच्या संशयावरून महिलेला मारहाण

नवऱ्याला फोन-मेसेज केल्याच्या संशयावरून महिलेला मारहाण

वडूज,

“तू आमच्या नवऱ्याला फोन आणि मेसेज का करतेस?” या कारणावरून वडूज येथील ३० वर्षीय महिलेला तीन महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया ओंकार ओतारी, पूनम रोहित कदम (दोघी रा. दहिवडी, ता. माण) आणि नकुसाबाई अंकुश शिंगाडे (रा. मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी संशयित महिलांची नावे आहेत.

बुधवारी (दि. २४) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास संशयित महिलांनी फिर्यादी महिलेला ड्रायर मशीन ठेवण्याच्या स्टीलच्या स्टँडने तसेच हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस नाईक पी. एल. जगदाळे आणि महिला पोलिस हवालदार ए. एस. काळभोर करत आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!