डिस्कळ येथे भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

डिस्कळ येथे भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

खटाव : पुसेगाव-फलटण राज्य मार्गावरील डिस्कळ (ता. खटाव) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महेंद्र जालींदर माने (वय ४०, रा. डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास महेंद्र माने हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच ११ बीएम ६४७६) पुसेगाव-फलटण मार्गाने डिस्कळकडे जात होते. डिस्कळ गावच्या हद्दीतील गाव ओढ्याजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की महेंद्र माने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.

याप्रकरणी मृत महेंद्र माने यांचे चुलते अविनाश सिताराम माने यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पुसेगाव पोलीस करीत आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!