डिझेल पुरवठा निर्बंधांमुळे उद्योगांवर संकट

डिझेल पुरवठा निर्बंधांमुळे उद्योगांवर संकट

सातारा,
औद्योगिक वापरासाठी डिझेल खरेदीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली असून, हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी साताऱ्यातील उद्योजकांनी आमदार Shivendraraje Bhosale यांच्याकडे केली. यावर मंगळवारी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही शिवेंद्रराजेंनी दिली.

केंद्र सरकारकडून औद्योगिक वापरासाठी केवळ २०० लिटर डिझेल खरेदीची मर्यादा घालण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर उद्योजकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या निर्बंधांमुळे अनेक उद्योगांना आवश्यक इंधन उपलब्ध होणार नसल्याने उत्पादन प्रक्रिया विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही उद्योगांना शिफ्टनिहाय उत्पादन सुरू ठेवण्याची वेळ येऊ शकते, तर काही उद्योग बंद पडण्याचाही धोका निर्माण झाला आहे.

याचा परिणाम रोजगार, उत्पादन क्षमता आणि औद्योगिक वाढीवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन उद्योजकांनी शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. डिझेल खरेदीवरील निर्बंध रद्द करावेत किंवा उद्योगांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

उद्योजकांच्या मागणीची दखल घेत शिवेंद्रराजे यांनी जिल्हाधिकारी Santosh Patil यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. स्थानिक स्तरावर कोणत्या उपाययोजना करता येतील याचा तातडीने आढावा घ्यावा आणि जिल्ह्यातील कोणताही उद्योग डिझेलअभावी बंद पडणार नाही, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीला Manufacturers Association of Satara (मास) चे अध्यक्ष धैर्यशील भोसले, Cooper Corporation चे फरोख कूपर, राहुल शिंदे, श्रीकांत पवार, नितीन तरडे, केदार साखरे, सौरभ पवार आणि आदित्य आहेरराव उपस्थित होते.

उद्योग क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या या प्रश्नावर आता मुख्यमंत्री स्तरावरील बैठकीकडे जिल्ह्यातील उद्योजकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!