चोरीच्या आळातून खून करणाऱ्यांना जन्मठेप

चोरीच्या आळातून खून करणाऱ्यांना जन्मठेप

मना न्यूज नेटवर्क

सातारा : झारखंड येथे असताना सायकल चोरीचा आळ घेतल्याच्या रागातून राजू शिकरा मुर्मू (वय २७, रा. झारखंड) याचा खून केल्याप्रकरणी २ रे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

राजेश बुधान टुडू (वय २५), गणेश सोनाराम मुर्मू (वय ३०, दोघेही रा. झारखंड, सध्या रा.संभाजीनगर सातारा) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे आरोपी साताऱ्यातील एका कंपनीत काम करत होते. यातील मयत राजू मुर्मू याला या दोघांनी १ जून २०२० रोजी सकाळी जेवण करण्यासाठी खोलीवर बोलावले होते. त्यावेळी आरोपींनी दारू पिली होती. झारखंड येथे असताना राजू मुर्मू याने आरोपी राजेश टुडू याच्यावर सायकल चोरीचा आळ घेतला होता. या कारणावरून दोघा आरोपींनी राजू मुर्मूचा डोक्यात दगड घालून खून केला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!