जून संपण्यापूर्वीच ई-केवायसी करा; नाहीतर हप्ता बंद!

जून संपण्यापूर्वीच ई-केवायसी करा; नाहीतर हप्ता बंद!

मना न्यूज नेटवर्क

सातारा ,

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. हे प्रमाणीकरण ३० जूनपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास लाभार्थी शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असे शासनाने म्हटले आहे. तर शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्याचे वर्षाला १२ हजार रुपये मिळतात.

३० जूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

केंद्र व राज्य शासनाने योजनेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. केवळ खऱ्या व हयात लाभार्थीपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचावा, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.

राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना आणखी तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. म्हणजे राज्याचे एकूण नऊ हजार मिळणार आहेत. तर केंद्राचे सहा हजार, असे एकूण १५ हजार मिळतील. पण, राज्य शासनाचे जादा तीन हजार मिळणार कधी हे गुपितच आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!