त्रिपुटी येथील गोपाळनाथ सरोवराची ग्रामस्थांकडून श्रमदानातून स्वच्छता

त्रिपुटी येथील गोपाळनाथ सरोवराची ग्रामस्थांकडून श्रमदानातून स्वच्छता

त्रिपुटी (प्रतिनिधी) :
त्रिपुटी येथील ऐतिहासिक व पुरातन वारसा लाभलेले गोपाळनाथ सरोवर (तळे) हे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे तळ्यातील पाण्याची पातळी घटल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेत श्रमदानातून तळे व परिसराची स्वच्छता मोहीम राबविली.

त्रिपुटी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पद्मसिंह सतीशराव काटकर यांच्या सामाजिक पुढाकारातून तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने तळ्यातील गाळ, कचरा व इतर घाण काढून पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची स्वच्छता करण्यात आली. यासोबतच तळ्याच्या परिसराचीही साफसफाई करण्यात आली.

या श्रमदान मोहिमेत ज्येष्ठ नागरिक दिलीप तायाराम काटकर, दत्तात्रय कुंडलिक काटकर, आशोक बापुराव काटकर, भगवान नारायण बोभाटे, प्रकाश भगवान देवगुडे, सोमनाथ हिंदुराव काटकर, विष्णू विठ्ठल काटकर, रामदास धनसिंग काटकर, रामदास आनंदराव शेंडे, राजेंद्र जगन्नाथ चव्हाण, उद्धव जगन्नाथ काटकर, लक्ष्मण तिम्मणा देवकर, समाधान माने, हर्षद माने, शिवलिंग केंडे, रुद्र काटकर आणि साईराज चव्हाण** यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

गावातील पिण्याच्या पाण्याचा स्रोत स्वच्छ व सुरक्षित राहावा तसेच पुरातन सरोवराचे जतन व्हावे या उद्देशाने ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदान केले. ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!