कराडमधील लॉजवर विवाहितेची आत्महत्या

कराडमधील लॉजवर विवाहितेची आत्महत्या

मना न्यूज नेटवर्क

कराड : कराड येथील सरगम लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणात शुभम महिपती लोखंडे (रा. खेडे, ता. शाहूवाडी) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. २०२३ पासून शुभम लोखंडे आणि तिच्यात कथित प्रेमसंबंध निर्माण झाल्याने तिच्या वैवाहिक आयुष्यात वाद निर्माण झाले होते. शुभम लोखंडे हा महिलेवर वारंवार लग्नासाठी दबाव टाकत होता. तसेच फोनवरून धमक्या देऊन मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत महिलेने यापूर्वी भोसरी येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र तक्रारही नोंदविली होती.

दि. १५ जून रोजी संबंधित महिला पुण्याला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. त्याच दिवशी सायंकाळी कराड येथील सरगम लॉजमध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Hello Satara Page No. 1 Jun 18, 2026 Powered by: erelego.com

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!