बंद घर फोडून साडे-दोन लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

बंद घर फोडून साडे-दोन लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

फलटण : तालुक्यातील जयवंतनगर राजाळे येथील जाधव वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सुमारे २ लाख ६६ हजार ३२ रुपये किमतीचा ऐवजलंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुष्पा विठ्ठल जाधव यांचे राहते घर १९ जून रोजी रात्री ९.३० ते २० जून रोजी पहाटे ५.३० या कालावधीत बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील रोकड व सोन्याचे दागिने चोरून नेले.

चोरी झालेल्या ऐवजात ७० हजार रुपये रोख रक्कम, १५ ग्रॅम वजनाचे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, १५ ग्रॅम वजनाची ४८ हजार १०२ रुपये किमतीची सोन्याची चेन, ७ ग्रॅम वजनाची २१ हजार रुपये किमतीची सोन्याची फुले तसेच ६६ हजार ९३० रुपये किमतीची दुचाकी यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून अधिक तपास फलटण ग्रामीण पोलिस करत आहेत.

दरम्यान, भरवस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!